हा गळेकाढू प्रकार अतीव स्मरणरंजनातून नि विद्वतेच्या अहंकारातून प्रकटतो…
विद्वान स्वत:च्याच विद्वतेच्या कोशात गुरफटून अहं कुरवाळण्याच्या वाईट खोडीमुळे ‘मी म्हणेल ते ब्रह्मवाक्य’ या आविर्भावात नॉस्टॅल्जिक गळे काढू लागतात, तेव्हा प्रश्न पडतो की, हे सगळं कशासाठी चाललंय? कोणत्याही काळाचं, पिढीचं मूल्यमापन तो काळ ओलांडून गेल्यावर होत असतं. साठोत्तरी महत्त्वाच्या कवींचं खऱ्या अर्थानं मूल्यमापन झालं ते थेट नव्वदोत्तर काळातच, पण अधीर मनानं नि टोकाचं स्मरणरंजन यातून ही गफलत होत असावी.......